प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मराठी | pm krushi sinchan yojana in marathi

 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कधी सुरू करण्यात आली?

pm krushi sinchan yojana in marathi :  मित्रांनो शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन योजना घेऊन येत असतात , अशाच एका नवीन योजनेबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण बघूयात. शेतकऱ्यांसाठी जोखीम कमी व्हावी व अत्याधुनिक तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची उपलब्ध करून देणे, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीस पाणी मिळणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवणे , त्या पाण्यातून पिकाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबद्दल माहिती

शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली गेली आहे. थोडक्यात या योजनेमध्ये नवीन जलस्रोत, पाणी साठवून ठेवण्याच्या पद्धती , मोठा जलसाठा तयार करणे, अशी कामे केली जातील. तसेच अनेक प्रकारचे सिंचनासाठी सरकारकडून अनुदान दिले जातील.

Pm krushi sinchan yojana प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक जुलै 2015 रोजी योजना सुरू केली, यामध्ये सरकारकडून शेतीसाठी मुबलक पाणी दिले जाईल, व शेतीला पाणी देण्यासाठी अनेक प्रकारच्या सिंचन पद्धतीवर देखील अनुदान दिले जाईल, त्यामुळे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरणार आहे, पुढे आपण बघूयात की या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी कागदपत्रे कोणती याबद्दल देखील आपण माहिती बघू.

pm krushi sinchan yojana in marathi प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना काय आहे?

1. आधार कार्ड असणे आवश्यक.
2. 7/12 प्रमाणपत्र, 8 अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असेल तर त्याबद्दलचे प्रमाणपत्र.
4. विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच असणे आवश्यक असणार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबुलाची नवीन देखील सादर करावी.
5. शेतकऱ्यांना फक्त ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंतच या योजनेचा लाभ घेता येईल.
6. शेतकऱ्याला पूर्व मंजुरी मिळाल्याशिवाय, त्याने अधिकृत विक्रेता आणि उत्तरांकडून सूक्ष्म सिंचन घेऊ नये, मंजुरी मिळाल्यानंतरच त्याने सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावी.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1. ७/१२ प्रमाणपत्र
2. ८ अ प्रमाणपत्र
3. खरेदी केलेल्या संचाचे बिल
4. पूर्वसंमती पत्र
5. विज बिल

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची उद्दिष्टे

1. कृषी उत्पन्न आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करणे.
2. सर्व शेतकऱ्यांसाठी सिंचन पद्धत सोयीस्कर होणे.
3. कुशल व कुशल बेरोजगारांसाठी एक रोजगाराची संधी उपलब्ध होणे.
4. आधुनिक तंत्र पद्धतीने सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.
5. जलवापराचा क्षमतेत देखील वाढ करणे.

>>महाडीबीटी ट्रॅक्टर योजना 2023<<

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदे

1. शेतकऱ्यांना सिंचन करणे सोपे जावे, व शेतकऱ्यांची पाण्याची कमतरता देखील भरून निघावी यासाठी ही योजना तयार केली गेली आहे.
2. या योजनेमध्ये पाण्याचे जास्त साठे तयार, व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पुरेसे पाणी दिले जाईल.
3. शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणाऱ्या अनेक प्रकारच्या सिंचन पद्धतीवर अनुदान दिले जाईल, त्यामुळे शेतीला पाणी देणेदेखील खूप सोयीस्कर होणार आहे.
4. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे कृषी उत्पादनात देखील वाढ होईल, व शेती विस्तार होईल.
5. या योजनेमध्ये 75% अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाईल आणि 25% अनुदान हे राज्य सरकारकडून दिली जाईल.
6 या योजनेमार्फत शेतीसाठी अनेक प्रकारच्या सिंचनाचा उपयोग केल्यामुळे पाण्याची देखील बचत होईल, आणि उत्पादनात देखील वाढ होईल.
7. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी जवळजवळ दोन ते तीन हजार कोटी खर्च केले जातील.
8. पाच हेक्टर पर्यंत जमिनीसाठी या योजनेचा लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा फायदा

पाणी किंवा सिंचन हा शेतीचा सर्वात आवश्यक घटक आहे, यावरूनच शेतीची उत्पादकता ठरते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अगोदर, बरेचसे शेतकरी शेतीसाठी पाण्याला पावसावर अवलंबून होते, पण या योजनेनंतर देशातील शेतकऱ्यांच्या सिंचन समस्या बऱ्यापैकी कमी होणार आहेत. आणि जे शेतकरी फक्त पावसावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी तर ही योजना एक वरदानच आहे. (pm krushi sinchan yojana in marathi )

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

मित्रांनो इतर योजनेप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्ही MahaDbt Portal वरून तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. या पोर्टल वरती तुम्हाला अनेक प्रकारच्या योजना दिसतील त्यापैकी तुम्ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शोधून तेथून अर्ज करू शकता. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी करून घ्यायची आहे. पुढे तुम्हाला स्वतःचे नाव टाकण्यासाठी कॉलम दिसतील तेथे तुमचे नाव, युजर नेम आणि पासवर्ड टाकून , तुम्ही नोंदणी करू शकता. त्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी देखील बंधनकारक आहे.

नोंदणी करताना तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित रित्या टाकावे, कारण त्याच मोबाईल नंबर वर तुम्हाला व्हेरिफिकेशन देखील करावे लागते. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करू शकता, आणि नंतर तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता. लगीन केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम तुमची प्रोफाइल पूर्णपणे भरून घ्या, त्यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती व शेत जमिनीची माहिती अचूकपणे भरणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पर्यावर क्लिक करून घ्यायची आहे, त्यानंतर शेतकऱ्याला हवे असलेले सिंचन या प्रकाराची निवड करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत, जसे ठिबक सिंचन, तुषार सिंचन असे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून घ्यावे . अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही तुम्हाला जी योजनेला प्राधान्य द्यायचे आहे त्याची निवड करा. त्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्याचा शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क भरल्यानंतरच तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल. अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेऊ शकता.

त्या महापोर्टलवर तुम्ही अजून दुसऱ्या प्रकारच्या योजनांचा देखील लाभ घेऊ शकता . तुम्हाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबद्दल बरीचशी माहिती मिळाली असेल, वरील माहिती प्रमाणे तुम्ही pradhanmantri krushi sinchan Yojana form भरू शकता व त्याचा लाभ घेऊ शकता.

Derek Lam Net Worth

Leave a Comment