ई श्रम कार्ड म्हणजे काय | ई-श्रम कार्ड ऑनलाईन नोंदणी

ई श्रम कार्ड म्हणजे काय ? काय आहेत सुविधा.

मित्रांनो आज आपण ई-श्रम कार्ड म्हणजे काय, फायदे काय आहेत, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघुयात. यामध्ये कामगारांना नोंदणी केल्यानंतर अपघाती विम्याची सुविधा देखील प्राप्त होईल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत असेल तर तात्पुरत्या अपंगत्व आल्यास एक लाख रुपये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.

इ-श्रम कार्डचे अजून काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

विष्रम कार्ड साठी कोण पात्र असणार

याठिकाणी नोंदणी करण्यासाठी भूमिहीन शेतकरी किंवा शेतमजूर शेतकरीच यामध्ये नोंदणी करू शकतो. मोठे शेतकरी किंवा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहेत ते ते या ठिकाणी नोंदणी करण्यास अपात्र ठरतात.[e shram card ke fayde in marathi]

सुविधा काय मिळणार

आपण ई-श्रम कार्ड म्हणजे काय? ई-श्रम कार्ड चे फायदे याबद्दल माहिती बघत आहोत, त्यामध्ये सुविधा काय मिळणार आहेत बघुयात,

यामध्ये 16 ते 59 या वयोगटातील कोणत्याही क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ मिळू शकतो, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डची जोडलेला असणे गरजेचे आहे, तुमचा मोबाईल आधार कार्डची जोडलेला असेल तर तुम्ही सीएससी सेंटर वर जाऊन तेथे ई-श्रम कार्ड साठी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करू शकता.

ई-श्रम कार्ड ऑनलाईन नोंदणी

ई-श्रम कार्ड ची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कामगार ई-श्रम मोबाईल ॲप या संकेत स्थळावर जाऊन तुम्ही तेथे नोंदणी करू शकता. त्याव्यतिरिक्त कामगार सुविधा, राज्य सेवा केंद्र, या ठिकाणीही तुम्ही नोंदणी करू शकता.

नोंदणी केल्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जातो आणि त्यासोबत ई-श्रम कार्ड दिली जाते.

ई-श्रम नोंदणी साठी वय

ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी साधारणता वय 16 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षापर्यंतचा कालावधीमध्ये पोर्टलवर आपण स्वतःची नोंदणी करू शकतो.

येथे फक्त असेच लोक नोंदणी नाही करू शकत जे असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आयकर देत नाहीत, तिथे असाच कामगार नोंदणी करू शकतो जो EPFO, NPS, ESIC यामध्ये सदस्य नाही, तसेच कामगार नोंदणी करू शकतात.

असंघटित कामगार म्हणजे काय

असंघटित कामगार म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्ड कार्डसाठी नोंदणी करू शकतात, त्यामध्ये घर कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, भूमिहीन शेतमजूर, फेरीवाले, इतर मजूर, जे असंघटित कामगारांमध्ये येतात ते या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतात.[ऑक्युपेशन चा अर्थ]

आपण काय शिकलो :

मित्रांनो आज आपण ई-श्रम कार्ड म्हणजे काय, ई-श्रम कार्ड नोंदणी कशी करावी, याबद्दलची माहिती बघितली, तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा, व तुमच्या बांधवांना देखील ही माहिती जरूर शेअर करा.(e shram card ke fayde in marathi)

 

 

 

Leave a Comment