शेअर मार्केट म्हणजे काय basic knowledge of share market in Marathi: मित्रांनो शेअर बाजार हा विकसित देशाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे कोणतीही नवीन कंपनी मार्केटमध्ये येण्याअगोदर शेअर बाजारात प्रवेश करते| शेअर बाजारामधून नवीन कंपनीला फंडिंगही प्राप्त होते|
आज आपण share market in Marathi शेअर मार्केट म्हणजे? याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, या व्यतिरिक्त आपण जाणून घेऊयात की शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची.
Basic knowledge of share market in Marathi | शेअर मार्केट अभ्यास
शेअर मार्केट मध्ये शेअर या शब्दाचा अर्थ एक “भाग” असा होतो. तुम्ही जर एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतला असेल तर तुम्ही त्या कंपनीत भागीदारी घेतली आहे असे देखील आपण म्हणू शकतो. म्हणजेच तुम्ही काही शेअर खरेदी करून तुम्ही कंपनीचे हिस्सेदार होतात. समजा एका कंपनीकडे 100 शेअर्स आहेत , त्यातील जर तुम्ही दहा शेअर विकत घेतले. तर तुम्ही त्या कंपनीचे टेन पर्सेंट भागीदार बनतात. आणि जशी कंपनी वाढत जाते तसा तुम्हालाही त्याचा फायदा होतो.
पण शेअर मार्केटमध्ये परिपूर्ण माहिती असल्याशिवाय गुंतवणूक करणे हे खूप महागात पडू शकते, जसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो व जर कंपनी चुकीची निवडलेली असेल तर तुम्हाला खूप मोठा लॉस देखील होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्या अगोदर त्या कंपनी बद्दल सर्व माहिती घेणे, त्या कंपनीचे फायनान्शिअल ग्रोथ कशी आहे ते देखील बघणे खूप गरजेचे आहे.
मार्केटमध्ये शेअरची किंमत कशी निर्धारित होते
मागणी आणि पुरवठ्याच्या काही नियमानुसार मार्केटमध्ये शेअरची किंमत निर्धारित होत असते, कंपनीचे शेअर जास्त विकले गेल्याने त्याची मागणी वाढते त्यामुळे जास्तीत जास्त लोक तेथे गुंतवणूक करतात व त्या स्टॉकची खरेदी करतात त्यामुळे त्या स्टॉक ची किंमत वाढते.
स्टॉक इंडायसेस म्हणजे काय?|
काही सारखेच स्टॉक एकत्रित केलेले असतात त्याला आपण इंडेक्स असे म्हणतो, त्यात काही निवडक स्टॉक एक्सचेंज मधील सूचीबद्ध अशा कंपन्यांचा समावेश असतो. कंपन्यांच्या आकारानुसार, व मार्केट कॅपिटलायझेशन आणि इतर श्रेणीच्या आधारावर या कंपन्या ठरवल्या जातात.
सेन्सेक्स : सेन्सेक्स हा एक सर्वात मोठा तीस कंपन्यांचा शेअरचा समावेश असलेला सर्वात जुना असा इंडेक्स आहे, हा इंडेक्स फ्री प्लॉट मार्केट कॅपिटलायझेशनच्या 45 टक्के प्रतिनिधित्व हा एकटा सेन्सेक्स करतो.
निफ्टी 50: निफ्टी फिफ्टी मध्ये टॉप 50 कंपन्यांचा समावेश होतो , निफ्टी फिफ्टी प्लॉट मार्केट कॅपच्या अंदाजे जवळजवळ 62 टक्के अकाउंट चा समावेश निफ्टी फिफ्टी मध्ये होतो.
शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी ( how to invest share market in Marathi)
शेअर मार्केट मध्ये यश मिळवण्यासाठी भरपूर गोष्टी शिकणे आवश्यक आहे, त्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केट काय आहे, शेअर मार्केट कंपन्या कशा चालतात, शेअर बाजारातील शेअरची प्राईस कशी वाढते किंवा कमी होते. हे सर्व बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे, डिमॅट अकाउंट मार्फत तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू शकता. डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी भरपूर कंपन्या आहेत.
जसे यातील कोणत्याही कंपनीमध्ये तुम्ही स्वतःचे डिमॅट खाते उघडू शकता, खाते उघडण्यासाठी तुम्ही या कंपनीच्या नावावर क्लिक करा, व पुढील प्रोसेस साठी तुमच्याकडे नवीन पेज ओपन होईल, तेथे संपूर्ण माहिती भरून तुम्ही स्वतःचे डिमॅट खाते ओपन करू शकता.
तुमचे डिमॅट खाते व्यवस्थित रित्या झाल्यानंतर, तुम्ही व्यवस्थितपणे कंपनी शोधून त्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता, तुम्ही कंपनीमध्ये गुंतवणूक ही कितीही दिवस करू शकतात, आणि भविष्यात कंपनीचा शेअर प्राईस वाढल्यानंतर विकून चांगला प्रॉफिट देखील तुम्ही करू शकता.
निफ्टी 50 म्हणजे काय ( what is Nifty 50 in Marathi)
आपण वर बघितल्याप्रमाणे निफ्टी फिफ्टी हा एक इंडायसेस आहे, यामध्ये 50 कंपन्या समाविष्ट असतात, निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजारांमधील एक महत्त्वाचा बेंच मार्क आहे. निफ्टी फिफ्टी हा NSE कडून सूचीबद्ध केला जातो, यामध्ये 50 टॉप कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्या त्यांच्या परफॉर्मन्स नुसार बदलूही शकतात , ज्या कंपन्या सर्वोत्तम असतात त्यांचा यामध्ये समावेश होतो.
शेअर मार्केट मध्ये तुम्ही डायरेक्ट प्रवेश करू शकत नाहीत, जसे मी वर सांगितले त्याप्रमाणे तुम्ही एका शेअर ब्रोकर कडे स्वतःचे डिमॅट खाते उघडून त्या मार्फतच शेअरची खरेदी विक्री करू शकता. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मार्केट ओपन टाईम मध्ये कधीही शेअर विक्री किंवा खरेदी करू शकतात, basic information of share market in Marathi मध्ये मी तुम्हाला सांगत आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची. जसे मी सांगितले तसे तुम्ही तुमच्या शेअर ब्रोकर च्या माध्यमातून शेअर खरेदी करू शकता.
शेअर बाजारातील ट्रेडिंग चे प्रकार | type of trading in marathi
1. इंट्राडे ट्रेडिंग (intraday trading in Marathi)
इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे तुम्ही एका दिवसासाठी शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकता. त्यासाठी तुमचा ब्रोकर तुम्हाला margin सुद्धा देत असतो. Margin म्हणजेच तुम्ही कमी पैशात जास्त शेअर खरेदी करू शकता. पण ही सुविधा तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग मध्येच मिळू शकते.
Intraday trading time : तुम्ही सकाळी 9:15 ते संध्याकाळी 3:30 पर्यंत एक दिवसीय केलेली ट्रेडिंग म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंग होय.
2. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय /swing trading/short term trading in Marathi.
स्विंग ट्रेडिंग म्हणजेच काही दिवसांसाठी केलेली ट्रेडिंग, म्हणजेच आठ दिवस एक महिना तीन महिने एवढे दिवस शेअर विकत घेऊन नंतर विकणे त्याला आपण स्विंग ट्रेडिंग असे म्हणू शकतो.
3. लॉन्ग टर्म ट्रेडिंग/ investing
लॉन्ग टर्म ट्रेडिंग त्यालाच आपण इन्वेस्टिंग असे देखील म्हणू शकतो. शेअर विकत घेऊन जास्त दिवस ठेवणे, म्हणजेच कमीत कमी एक वर्ष आणि त्याच्यापुढे शेअर विकत घेऊन ठेवणे आणि नंतर विकणे त्याला आपण लॉन्ग टर्म ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग असे म्हणू शकतो. यामध्ये तुम्ही चांगल्या कॅपिटलायझेशन असलेल्या कंपन्या, चांगली ग्रोथ असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता.
गुंतवणूक करताना काही बाबी
तुम्ही अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करा की ज्या कंपनीवर तुम्हाला विश्वास आहे की जी कंपनी भविष्यामध्ये चांगली ग्रोथ देऊ शकते, व सध्या त्या कंपनीचे प्रोडक्ट चांगले विकत आहेत, व भविष्यातही त्या कंपनीचा व्यवसाय अजून वाढू शकतो अशाच कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली योग्य राहील. [Basic knowledge of share market in Marathi pdf]
कंपनी निवडताना तुम्ही कंपनीची फायनान्शिअल स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्ही कंपनी निवडल्यानंतर तिच्याबद्दल माहिती गोळा क रणे व ती कंपनी विश्वास पात्र आहे की नाही अशा सर्व गोष्टी बघणे आवश्यक आहे. सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर एका परिपूर्ण कंपनीमध्ये तुम्ही स्वतःची गुंतवणूक करू शकता. भविष्यातही ती कंपनी अजून ग्रोथ वाढवत असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.
स्टॉक ब्रोकर म्हणजे काय | what is stock broker in Marathi
स्टॉक ब्रोकर म्हणजे काय याबद्दल म्हटले तर स्टॉक ब्रोकर अशी एक कंपनी असते की ज्या मार्फत आपण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो. म्हणजे आपण जर एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण स्टॉक ब्रोकर ला कमेंट देऊन तेथे गुंतवणूक करू शकतो. आणि जर काही प्रॉब्लेम जरी उपस्थित झाला आणि स्टॉक ब्रोकर तुमच्या कमांड न देता सुद्धा काही गोष्टी करत असेल तर तुम्ही तुमच्या ब्रोकरची तक्रार देखील करू शकता. तुम्ही आपल्या स्टॉक ब्रोकर ची तक्रार SEBI कडे करू शकता.
सेबी म्हणजे काय | what is SEBI in marathi
SEBI full form – securities and exchange board of India
SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया.
सीबी ही भारतातील सिक्युरिटी ज आणि शेअर मार्केटवर देखरेख ठेवणारी एक नियमक कंपनी आहे. सेबीचे उद्दिष्ट म्हणजेच गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करणे व शेअर मार्केटला विकासासाठी चालना देणे हे देखील त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सीबी ही भारतीय शेअर बाजारतील बाजारपेठेला पारदर्शकता देण्याचे काम करते. गुंतवणूकदारांची जर फसवणूक होत असेल तर त्याचे निदान करणे हे सेबीचे उद्दिष्ट आहे, शेअर बाजारावर नियंत्रण व नियमन करणे सेबीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शेअर मार्केट टिप्स | share market tips in Marathi)
पैशांना सुनिश्चित करा
Besic knowledge of share market in Marathi यामध्ये इन्वेस्टमेंट करताना तुम्ही किती इन्वेस्टमेंट करणार आहात त्याची सुनिश्चितता तुम्ही केली असावी. म्हणजेच तुम्ही आधीच ठरवलेले असावे की तुम्ही किती गुंतवणूक करणार आहात.
गुंतवणूक करण्या अगोदर नियम
कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करणे अगोदर किंवा ट्रेडिंग करण्या अगोदर तुम्ही त्या गोष्टीचे परिपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. कारण शेअर मार्केट जेवढे सोपे दिसते तेवढे नसते. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करणे अगोदर त्या ठिकाणची परिपूर्ण माहिती घेणे खूप आवश्यक आहे.
तसेच ट्रेडिंग करताना देखील तुम्ही technical analysis, fundamental analysis हे सर्व माहिती घेणे व शिकणे आवश्यक आहे.
शेअर मार्केट बद्दल माहिती कशी मिळवावी /basic knowledge of share market in Marathi
शेअर मार्केट बद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही युट्युब वर देखील भरपूर एज्युकेटेड लोकांचे व्हिडिओ बघू शकता. व तुम्ही गुगलवर देखील आर्टिकल वाचून तुमचे नॉलेज वाढवू शकता. सध्या तर ऑनलाईन पद्धतीने भरपूर कोर्सेस शेअर मार्केट बद्दल तुम्हाला मिळून जातील. शेअर मार्केटचे परिपूर्ण नॉलेज घेतल्यावरच तुम्ही गुंतवणूक करावी.
ट्रेडिंग मध्ये सायकॉलॉजी नियंत्रण / trading phycology in marathi
तुम्ही ट्रेडिंग करत असताना तुमच्या सायकॉलॉजीवर नियंत्रण ठेवणे कारण ट्रेडिंग मध्ये सायकॉलॉजी खूप महत्त्वाची मानली जाते. ट्रेडिंग करताना तुम्ही लॉस केला असेल तर तो कमी प्रमाणात करावा व प्रॉफिट होत असेल तर तुम्ही जास्त प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुमची रिस्क देखील मॅनेज होते. व तुम्ही संपूर्ण काळ ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट मध्ये असता.
तुम्हाला जर इंट्राडे बद्दल परिपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा intraday trading in Marathi हा लेख वाचू शकता.
मित्रांनो आज आपण बघितले की basic knowledge of share market in Marathi याबद्दल आपण काही माहिती बघितली. यामध्ये शेअर मार्केट म्हणजे काय, इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय अशा अनेक प्रकारची माहिती बघितली. तुम्हालाही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा व तुमच्या मित्रांना देखील ही माहिती जरूर शेअर करा. आणि शेअर मार्केट परिपूर्ण शिकल्यावरच तुम्ही ट्रेडिंग करावी.