अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छा संदेश | ahilyabai holkar jayanti 2023
सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Ahilyabai Holkar jayanti quotes in Marathi : अहिल्यादेवी होळकर यांचे इतिहासामध्ये खूप मोठे योगदान आहे व त्यांचे कामही खूप मोठे आहे, त्यांनी महिला शक्ती चा परिचय संपूर्ण जगाला करून दिलेला आहे.
आज आपण अहिल्यादेवी होळकर जयंती त्यांना विनम्र अभिवादन देत आहोत, त्यासाठीच मी काही अहिल्यादेवी होळकर संदेश मराठी, अहिल्यादेवी होळकर भाषण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे
अहिल्याबाई होळकर जयंती 2023
पूर्ण नाव | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर |
जन्म | 31 मे 1725 |
वडील | माणकोजी शिंदे |
आई | सुशिलाबाई शिंदे |
पती | खंडेराव होळकर |
घराणे | होळकर घराणे |
धर्म | हिंदू |
मृत्यू | 13 ऑगस्ट 1795 |
अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड जवळच्या चौंडीया गावांमध्ये 31 मे 1725 रोजी झाला, त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे हे होते.
सतराशे 54 मध्ये झालेल्या कुंभहेरच्या लढाईमध्ये त्यांचे पती खंडेराव होळकर हे त्यांना सोडून गेले . स्वभावाने शांत असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांनी लोक कल्याणासाठी ही खूप प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या पती नंतर अहिल्यादेवी होळकर या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघून लागल्या होत्या.
उचित न्यायदानासाठी देखील अहिल्यादेवी होळकर खूप प्रचलित होत्या, त्यांनी भारतातही अनेक मंदिरे व नदी घाट देखील बांधले आहेत. तसेच त्यांनी अनेक तीर्थक्षेत्र व धर्म शाळांचेही बांधकाम केले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दलची मते
त्या अतिशय योग्य शासक संघटक होत्या, भारताच्या इंदूरमधील त्यांनी राज्य केले होते सुमारे 30 वर्ष तेथे त्यांनी राज्य केले.
जसे शिवाजी महाराजांना पुरुषांमधील उत्तम राजे मानले जाते तसेच स्त्रियांमधील अहिल्यादेवी होळकर या उत्तम राज्यकर्त्या होत्या.
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या असामान्य कर्तुत्वाने रयतेचे मन जिंकून घेतले होते. अहिल्यादेवी होळकर या एक विस्तृत राजकीय दृष्टी पाटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकरत्या देखील होत्या.
अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली कामे
Ahilyabai Holkar jayanti quotes in Marathi | अहिल्याबाई होळकर फोटो
१. चांदवड चा रंग महाल
२. इंदूरचा राजवाडा
३. होळकर वाडा
४. किल्ले महेश्वर
५. वाघवाडा (काठापुर)
६. अहिल्यादेवीचा किल्ला (लासलगाव)
अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील पुस्तके
– अहिल्याबाई चरित्र’
– अहिल्याबाई होळकर
– अहिल्याबाई
– कर्मयोगिनी
– शिवयोगी (कादंबरी
– महाराष्ट्राचे शिल्पकार-तेजस्विनी अहिल्यादेवी होळकर
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
Read More….. ज्योतिबा फुले यांचे महान विचार
Ahilyabai Holkar jayanti 2023 | अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छा संदेश
लोककल्याणकारी राणी अहिल्या , राज्यकारभारात तरबेज होत्या, दीन-दुबळ्यांसाठी आईसमान ,तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या, *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*
पुरुष जातीचा बडगा छेदून केलीत तुम्हीं समाजसेवा ! भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा !! जात-धर्म विसरुन दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा! ‘अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा !! *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*
प्रथम स्त्री सेनानी तू न्यायप्रिय तत्त्वज्ञानी राणी ! सर्वश्रुत धनुर्धर तू, धर्मरक्षक स्त्री उद्धारक क्षत्राणि !! कुशल संघटक तू, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या महाराणी ! कर्मयोगिनी स्त्री तू, झळके इतिहासाच्या पानी !! *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*
घडविले जे जे आपण , करावे त्याचे रक्षण ,बाणेदारपणे उत्तर देणाऱ्या ,अहिल्याबाई ना त्रिवार वंदन , *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*
डोक्यावर पदर ढळला नाही ज्यांच्या ,राहिली पती निधनानंतर खंबीर ज्या, डोळ्यात दिसे सात्विकतेचा भाव त्यांच्या, धन्य अहिल्याबाई होळकर त्या, *अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*
आपण बघितले की ahilyadevi Holkar jayanti quotes in Marathi मध्ये त्यांचे कर्तुत्व किती महान होते हे आपल्याला वरील लेखांनुसार समजते. अशा या महान व्यक्तिमत्वाला म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन.