सरपंच पदाची निवड, पात्रता| सरपंच बद्दल मराठी माहिती

सरपंच बद्दल माहिती | सरपंच पदाची निवड,पात्रता

आज आपण आपल्या गावातील सरपंच पद , सरपंच यांचे कार्य, सरपंचांची निवड कशी केली जाते, आहे त्यांचा कार्यकाळ याबद्दल काही चर्चा करणार आहोत.

सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम बघत असतो.

सरपंच पदाची निवड, पात्रता

सरपंचांची निवड मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की सरपंचांची निवड ही जनतेतून केली जाते, तीन जुलै 2017 च्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार यापुढे सरपंचांची निवड थेट जनतेतून केली जाते.

ग्रामसभेचे सरपंचपद अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय आणि महिला यांच्यासाठी ठरवून दिलेल्या पद्धतीने कर्मचारी राखून ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे

कार्यकाळ

सरपंच पदासाठी कार्यकाळ असतो पाच वर्षांचा

शैक्षणिक पात्रता

उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ही आठ 1 जानेवारी 1995 नंतर जन्म झालेल्या साठी लागू राहील.

राजीनामा

सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापती यांच्याकडे देतात.

कार्य

सरपंच यांना ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम बघावे लागते.

• ग्रामपंचायतीच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषविने
•ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे, बैठकीचे नियंत्रण व मार्गदर्शन करणे.
• कायद्यातील तरतुदी व ग्रामपंचायतीने वेळोवेळी पास केलेले ठराव यांची अंमलबजावणी करणे.
• ग्रामपंचायतीच्या नोकरदार वर्गावर देखरेख ठेवणे.
• ग्रामपंचायतीची मालमत्ता तपासणी व सर्व आर्थिक व्यवहार पाहणे.
• ग्रामपंचायतीच्या हिशेबाची तपासणी करणे.
• पंचायत समिती, जिल्हा परिषद व राज्य सरकारने वेळोवेळी मागवलेली आवश्यक माहिती पुरवणे.
• ग्रामसभेच्या बैठका बोलणे व त्यांचे अध्यक्षस्थान भूषविणे.

उपसरपंच
ग्रामपंचायती मधूनच निवडून आलेले सदस्य पैकी एकाचे उपसरपंच म्हणून निवड केली जाते.

Leave a Comment